
शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था औरंगाबाद व क्विकहिल फाउंडेशन, पुणे यांच्यामध्ये समंजस करार (mou).
“आता सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे प्रत्येक जण मोबाईलचा वापर करत आहे त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहे अशा वेळी सर्वांनीचसायबर सुरक्षा विषयी जागरूक राहावे” असे आवाहन सायबर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती यादव यांनी केले. दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात श्रीमती यादव शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था व मौलाना आझाद महाविद्यालयातील संभाजीनगर येथील सायबर योद्धा यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सर्व सायबर साक्षरता सायबर सुरक्षा पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था संभाजीनगर मधील 83 विद्यार्थ्यांनी सायबर सायबर योद्धा म्हणून पायाभूत प्रशिक्षण घेतले, क्विकहिल फाउंडेशनच्या वरिष्ठ कार्यक्रमाधिकारी श्रीमती सुगंधा दाणी यांनी प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण घेतलेले सर्व सायबर योद्धा(विद्यार्थी) संभाजीनगर मधील वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन सायबर सुरक्षा बाबत सर्व विद्यार्थ्यांना सायबर साक्षर करतील. या सर्व कार्यक्रमासाठी शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेचे समन्वयक डॉ. चरणसिंग कायटे हे मार्गदर्शक म्हणून काम पाहतील.


Student Attendance List