एक दिवसीय कार्यशाळा

सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा

शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था औरंगाबाद व क्विक हील फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचा आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यशाळेमध्ये प्रमुख अतिथी श्रीमती प्रविणा यादव पोलीस निरीक्षक ,सायबर पोलीस स्टेशन, आयुक्तालय छ. संभाजीनगर ह्या होत्या तर कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थान डॉ. राजेंद्र सातपुते,संचालक न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, छ. संभाजीनगर यांनी भूषवलं होतं श्रीमती प्रविणा यादव यांनी आपल्या भाषणांमधून सायबर सुरक्षा बाबत सगळ्यांना अवगत केले त्यानंतर डॉ. राजेंद्र सातपुते यांनी उद्घाटन पर भाषण केले तसेच डॉ. चरणसिंग कायटे व श्री राहुल भारती यांनी देखील सायबर सुरक्षा व सायबर साक्षरता या विषयावरती व्याख्याने दिली