शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था छ. संभाजीनगर ला NAAC ‘A’ ग्रेड

शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था छ. संभाजीनगर चे नॅक बंगळुरू या संस्थेकडून मूल्यांकन करण्यात आले असून, महाविद्यालयाला ३. ०३ एवढे गुण म्हणजेच A ग्रेड मिळाला आहे.मागील ३ व ४ नोव्हेंबर रोजी नॅक मूल्यांकन समितीने भेट देऊन संस्थेच्या विविध अभ्यासक्रम, उपक्रम व स्थितीबाबत परीक्षण व मूल्यांकन केले. या मूल्यांकन समितीच्या पीअर टीममध्ये चेअरमन म्हणून डॉ. विनोद कुमार माजी कुलगुरू ,गुरुकुला कांग्री विद्यापीठ, हरिद्वार , डॉ. सतीश वर्मा डायरेक्टर व विभाग प्रमुख मेडिकल कॉलेज दिल्ली व डॉ. अजय अग्रवाल ,सरोजनी नायडू मेडिकल कॉलेज आग्रा यांनी संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन केले. मूल्यांकनात संस्थेची इमारत, परिसर, संस्थेत विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम, शिकवला जाणारा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून संस्थेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग, संस्थेतून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मिळालेला रोजगार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक, विविध सामाजिक संस्थाचे कार्य इत्यादीचे पहिल्या सायकलसाठी मूल्यांकन करण्यात आले. संस्थेच्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत संस्थेचे संचालक डॉ. राजेंद्र सातपुते , नॅक समन्वयक डॉ राजेश कुमार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी सहभागी झाले होते.